
श्रीगोंदा :- बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेची दि. 2 रोजी श्रीगोंदा येथे पार पडली. बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष वामनभाऊ भदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री. कांतीलाल कोथिंबीरे पोलीस निरीक्षक मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने श्रीगोंदा तालुक्यातील, नगर जिल्हा व महाराष्ट्र मध्ये शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी परिदत्त महिला, विधवा महिला, विद्यार्थी,कामगार बहुजन समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन क्रांती सेना प्रचंड मोठ्या ताकतीने संघर्ष करणार असा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. बहुजन क्रांती सेनेच्या माध्यमातून प्रथमता श्रीगोंदा तालुक्यामध्ये ज्या काही समस्या असतील त्या समस्या संदर्भामध्ये उपोषण व आंदोलनाच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना काम करणार अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले. यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष वामनभाऊ भदे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील परिस्थिती उपस्थितांसमोर मांडली. श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, श्रीगोंदा तालुक्यातील सरकारी दवाखान्यात विविध उपकारांची असणारी कमतरता, विधवा महिलांना श्रीगोंदा मध्ये तहसील मध्ये छोट्या मोठ्या कामांसाठी सुद्धा दोन हजारापेक्षा जास्त पैसा त्या ठिकाणी दलाल लोकांना द्यावा लागतो. श्रीगोंदा तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दोन नंबर धंदे बिनधास्तपणे चालू असून या सर्व गोष्टी वरती कसलाच वचक पोलीस अधिकाऱ्यांचा राहिलेला नाही. अशी परिस्थिती आहे बहुजन क्रांती सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना महिला माता-भगिनींना विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम आपण सर्व मिळून करू असे आवाहन वामनभाऊ भदे यांनी उपस्थित असणाऱ्या कार्यकारी मंडळाला केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक श्री कांतीलाल कोथिंबीरे यांनी आपले विचार व्यक्त केले त्यांनी बोलताना सांगितले की कोणतीही संघटनेची सुरुवात छोटीच असते परंतु संघर्ष केला गोरगरिबांना सर्वसामान्य न्याय मिळवून दिला तर त्या माध्यमातून बहुजन क्रांती सेना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र मध्ये आपले वलय तयार करू शकते. त्यांनी यावेळी बोलताना काही उदाहरणे देखील दिली सुरुवातीला प्रहार संघटना सुद्धा छोटीच होती नंतर त्याचे पक्षामध्ये रूपांतर झाले. यशवंत सेना सुद्धा छोटीच होती पण त्याचा सुद्धा राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून निर्मिती झाली. तुम्ही किती काम करता व किती प्रामाणिकपणे काम करतात याच्यावरती सर्व काही अवलंबून असते. सर्व कार्यकर्त्यांनी असाच जर प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी लावून धरली तर तुमचं भवितव्य दूर नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी यांचे मनोगत व्यक्त केली बहुजन क्रांती सेनेचे महाराष्ट्राचे पदाधिकारी शिवाजी राऊत, राजेंद्र कोथिंबिरे, साहेबराव रासकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बहुजन क्रांती सेनेचे वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून श्री. मनोज शिंदे यांची निवड करण्यात आली, तसेच बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र राज्य वाहतूक आघाडीचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष म्हणून श्री.नवनाथ गवळी यांची निवड करण्यात आली व श्री.संजय घोडके यांची निवड बहुजन क्रांती सेना तालुका उपाध्यक्ष म्हणून करण्यात आली. यावेळी बहुजन क्रांती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

