
सोपान सासवडे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी अहिल्यानगर.
ज्ञानाच्या अनुभवाची शिदोरी देण्याचे कार्य हे शाळा व शिक्षक करीत असतात. निरोप हा शिष्टाचार नाही तर अविष्कार आहे. याला निरोप समारंभ कार्यक्रम म्हणायचे नाही तर शुभेच्छा समारंभ कार्यक्रम म्हणायचे असे प्रतिपादन प्राचार्य राजेश मोकाटे यांनी केले. चापडगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. दादासाहेब ज्योतीक तसेच बारावी निरोप समारंभ कार्यक्रमास प्राचार्य मच्छिंद्र फसले हे होते . कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे , प्रा. सोमनाथ वडघणे , प्रा. पूजा आहेर अशोक आघवणे , विद्यावर्धिनी मुळे , सर्जेराव निकाळजे , गणेशकुमार मोरे , प्रा. अनिल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. राजेश मोकाटे पुढे म्हणाले की शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे. उंच आकाशी बुलंद झेप घ्यायची असेल तर हे शाळा व शिक्षक शिकवतात. आपल्या संस्थेमध्ये विविध शाखा तुमच्या उज्वल भविष्यासाठी उपलब्ध आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मच्छिंद्र फसले व प्रा. दादासाहेब ज्योतीक आपल्या मनोगतात म्हणाले की, यशाला शॉर्टकट नसतो. यश मिळवण्यासाठी स्वयंशिस्त महत्वाची आहे. विधायक मार्गाचा अवलंब करून यश मिळवावे असे आवाहन त्यांनी केले. जेष्ठ शिक्षक गणेशकुमार मोरे यांनी आपल्या मनोगत म्हणाले की , डोंगर वादळासारख्या संकटाचा सामना दिराने करा. जीवनात इतके मोठे व्हा की जगाला आपल्याकडे पाहून हेवा वाटेल. कॉपीमुक्त परीक्षेला सामोरे जा. आपल्या आई-वडिलांच्या नजरेत तुम्ही हिरो हिरोईन व्हा. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रा. सोमनाथ वडघणे व प्रा.पूजा आहेर यांनी देखील बी व डी फार्मसी प्रवेश प्रक्रिया समजून सांगितली व भविष्यातील नोकरी संदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमधून आदिती पातकळ , पायल शिरसाठ , भक्ती सुरोसे , साक्षी लोहकरे , निकिता पोले आदी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी काळे प्रास्ताविक आरती काळे हिने केले तर आभार सान्वी गायकवाड हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे सहकार्य लाभले.
