पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख

पाथर्डी तालुक्यातील अत्यंत नावाजलेले न्यु इंग्लिश स्कूल शाळेचे स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले,या कार्यक्रमाचे उद्घाटक हुतात्मा बाबू गेणु शिक्षण संस्थेचे सचिव श्री कुशलदादा भापसे, प्रमुख पाहुणे म्हणून मार्केट कमिटी संचालक श्री शेषराव आण्णा कचरे,व्रुध्देश्वर कारखान्याचे संचालक श्री सुभाष पा ताठे, पाडळी गावचे सरपंच श्री अशोक गर्जे, सोसायटी चेअरमन श्री बाळासाहेब कचरे,ढ,वाडी सरपंच बाबासाहेब चितळे, परमेश्वर टकले, बाबुराव गर्जे, बाबुराव बांगर, भाऊराव कराळे, डॉ.म्हस्के,भागचंद गर्जे, शंकर भिसे,नानासाहेब गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री विनायक कचरे सर यांनी खुप नियोजन बद्ध व्यवस्था करण्यात आली होती, या कार्यक्रमासाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनींनी भाग घेतला होता, या मध्ये हिंदी, मराठी, लोकगीते , कोळी गिते,मुक अभिनय, रिमिक्स,लावणी, भावगीत , विविध पोशाख करुन मुलांनी प्रेक्षकांची मने जिंकली, प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला, या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत घेतली, कार्यक्रमासाठी चितळी, पाडळी,ढवळेवाडी,हत्राळ,सैदपुर व परीसरातील ग्रामस्थ व महीला बहुसंख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खाडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री विनायक कचरे सर यांनी मानले.
