कशी सोतासाठी जगूमाय, बहीण,
लेकं मी कशी कामापासून भागू सांगनवं बयना मी कशी सोतासाठी जगू !!
सासूचं दुखणं हाय म्हतारा माह्या सासरा सुनं बिगर त्यासनी कोन देईन आसरा !!
घरदारं सोडून सन्या कशी पंढरी मी बघू सांगनवं बयना मी कशी सोतासाठी जगू !!
भावा परी दीर आहे बहिणी सारख्या नंदा कालेज शिक्षणापाई हाये लई कामधंदा !!
त्यांच्या संग सांग कशी परक्या सारखी वागू सांगनवं बयना मी कशी सोतासाठी जगू !!
घरधनी हाय माह्या कष्टकरी शेतकरी राब राब राबतोया वावरात बांधावरी !!त्यास्नी सोडून एकली सांग सुखं कसं भोगू सांगनवं बयना मी कशी सोतासाठी जगू !!
घरी दारी खुशी आली पूर् झालं गणगोत नवा जिव आला पोटी कसा हासत रडत !!
आभायातल्या देवाले आता सांग काय मागू सांगनवं बयना मी कशी सोतासाठी जगू !!
लेकीं बाईचं जीवन असच असते माय वाहत्या गंगेच पाणी गोठ्यात कपिला गाय !!
मनाची ही घालमेल कशी कोणाले मी सांगू सांगनवं बयना मी कशी सोतासाठी जगू !
✍️वासुदेव महादेवराव खोपडे सहा. पोलीस उपनिरीक्षक(सेनि) अकोला 9923488556

