पैठण प्रतिनिधी श्रीपत पवार

चितेगाव येथे दिनांक सात डिसेंबर 2024 रोजी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत परिवर्तन जनसेवा फाउंडेशन व रिदम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत उपस्थिती महिला उद्योजकांसाठी संवेदनशील आणि क्षमता निर्माण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती एस एस एम इ कामगिरी वाढवणे आणि वेग वाढवणे आर ए एम पी शासनाची योजना उद्योजक महिला प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये उद्योजक महिला व अनुसूचित जाती व जमाती व डिजिटल पद्धतीने कर्ज अर्ज हे प्रमुख विषयाला अनुसरून यस यस यम इ म्हणजे काय त्यांचे कार्य काय व विविध व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर महिलांनी निवडलेल्या व्यवसायाबद्दल सखोल चर्चा करून त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना ज्या महिलांसाठी कार्यरत आहे त्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी कसे बनवता येईल व महिलांची उन्नती कशी होईल याबद्दल प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षण विलास नवगिरे यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर समन्वयक उद्धव घुले मंगल नवगिरे यांनी महिलांना उद्योजक संदर्भात माहिती दिली त्याचबरोबर सूक्ष्म लघु व मध्यम काय आहे या संदर्भात माहिती दिली व कर्ज प्रकरण कसे करावे या संदर्भात माहिती देण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिव श्रीमती कोमल घुले मंगल नवगिरे सोमय्या शहा निलोफर पठाण यांचे सहकार्य लाभले व या प्रशिक्षण कार्यक्रमास चितेगाव येथील महिला उद्योजिका उपस्थित होत्या शेवटी प्रशिक्षण सहभाग प्रमाणपत्र एसएससी इ नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.
