पैठण प्रतिनिधी श्रीपत पवार

पैठण तालुक्यातील लिंबगाव येथे दिनांक 14/ 12/ 2024 पासून हरिभक्त परायण अंकुश महाराज तळपे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समस्त ग्रामस्थ लिंबगाव यांच्या सहकार्याने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व राम कथा यज्ञ सोहळा पार पडणार आहे व्यासपीठ चालक ह भ प अंकुश महाराज तळपे श्रीक्षेत्र पैठण व राम कथा प्रवक्ते श्री ह भ प कार्तिक महाराज तळपे श्री क्षेत्र पैठण हे आहेत दैनंदिन कार्यक्रम असा पहाटे 4 ते 6 काकडा भजन 6 ते 7 विष्णुसहस्रनाम 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण 11 ते 12 गाथा भजन 2 ते 5 रामायण कथा 5 ते 6 हरिपाठ 7ते 9 हरि कीर्तन व नंतर हरि जागर होईल पहिले कीर्तन दिनांक 14 /12/ 2024 शनिवार रोजी ठिक सायंकाळी 7 ते 9 वाजता हरिभक्त परायण अंकुश महाराज तळपे भागवत आश्रम श्रीक्षेत्र पैठण दुसरे कीर्तन दिनांक 15 /12/ 2024 रविवार रोजी ठिक सायंकाळी 7 ते 9 वाजता हरिभक्त परायण बापूराव महाराज अढवणकर परतुर तिसरे कीर्तन दिनांक 16/ 12 /2024 सोमवार रोजी सायंकाळी 7 ते 9 वाजता श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज राऊत गणोरीकर यांचे होईल चौथे कीर्तन 17/ 12 /2024 मंगळवार रोजी सायंकाळी 7 ते 9 वाजता श्री हरिभक्त परायण विश्वंभर महाराज माळोदे घनसावंगीकर यांचे होईल पाचवे कीर्तन दिनांक 18/ 12/ 2024 बुधवार रोजी सायंकाळी 7 ते 9 वाजता श्री हरिभक्त परायण शरद महाराज फासाटे श्रीक्षेत्र पैठण यांचे होईल सहावे कीर्तन दिनांक 19 /12 /2024 गुरुवार रोजी सायंकाळी ठीक 7ते 9 वाजता श्री हरिभक्त परायण केशव महाराज चावरे उर्फ अण्णा कोळी बोडखा यांचे होईल सातवे किर्तन दिनांक 20 /12/ 2024 शुक्रवार रोजी सायंकाळी 7 ते 9 वाजता श्री हरिभक्त परायण शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगेश महाराज पालखी वाले यांचे होईल आठवे कीर्तन दिनांक 21/ 12/ 2024 शनिवार रोजी सकाळी 10 ते 12 वाजता श्री हरिभक्त परायण गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले उर्फ अण्णा संत एकनाथ वारकरी शिक्षण संस्था पैठण यांचे काल्याचे किर्तन होईल नंतर महाप्रसाद होईल तरी सर्व ग्रामस्थ मंडळी लिंबगाव तसेच बाहेरील गावच्या भावीक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती समस्त ग्रामस्थ मंडळ लिंबगावकर करीत आहे
